अभ्यासक्रम
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग ही शासकीय अनुदानित शाळा असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ( S. S. C Board) यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे पालन करते. इयत्ता पाचवी ते आठवी साठी बालभारती व नववी दहावी साठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ यांनी नेमून दिलेला अभ्यासक्रम शाळेमध्ये घेतला जातो.
इ 5 वी ते 10वी माध्यम: सेमी इंग्लिश, मराठी
प्रशालेमध्ये प्रत्येक इयत्तेच्या एकूण सहा तुकड्या आहेत त्यातील पाच तुकड्या या सेमी इंग्लिश व सहावी तुकडी ही मराठी माध्यमाची आहे. एका शैक्षणिक वर्षात दोन सत्र असतात
सर्वसाधारण अभ्यासक्रम
इ 5 वी ते 8 वी = मराठी,इंग्रजी, हिंदी/ संस्कृत, गणित, विज्ञान इतिहास,भूगोल,शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव, संगणक
इ 9वी ते 10वी = मराठी,इंग्रजी, हिंदी/ संस्कृत,गणित,विज्ञान इतिहास, भूगोल
श्रेणीबद्ध विषय= शारीरिक शिक्षण जलसुरक्षा,आर एस पी, स्काऊट , N. C. C.
कौशल्य विकास, कला, क्रीडा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणासारखा मुख्य विषयांचा समावेश आहे.
व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास
- रोबोटिक्स प्रयोगशाळा – आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण
- गणित प्रयोगशाळा – गणितीय संकल्पनांचा सखोल अभ्यास
- विज्ञान प्रयोगशाळा – प्रयोगाधारित विज्ञान शिक्षण
- इंग्रजी प्रयोगशाळा – संभाषण व भाषा कौशल्यविकास
- हार्डवेअर शिक्षण – तांत्रिक कौशल्यांचा विकास
- परकीय भाषा शिक्षण – जागतिक संधींसाठी भाषा प्रावीण्य
- नाट्यछंद वर्ग – अभिनय व सांस्कृतिक कौशल्ये
शालेय शिक्षणाला नवे आयाम देणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्कृष्ट पाऊल आहे.