प्रवेश सुरु

पायाभूत सुविधा

आमच्या शाळेबद्दल

१. रमणबाग प्रशालेला विस्तीर्ण असे शालेय आवार लाभलेले आहे. प्रशालेत एकूण 36 वर्ग खोल्या आहेत.
 
२. मुख्याध्यापक कक्ष, पर्यवेक्षक कक्ष, शालेय कचेरी, शिक्षककक्ष, शिक्षिकाकक्ष आहेत. 

३. प्रशालेस विस्तीर्ण असे मातीचे मैदान लाभले आहे. या मैदानावर विद्यार्थी खो-खो, कबड्डी फुटबॉल, क्रिकेट, ॲथलेटिक्स इखेळांचा सराव करतात. 

४. चित्रकला विषयासाठी स्वतंत्र वर्गखोली तसेच कलांसाठी समर्पित असे कलादालन म्हणजेच कलाग्रामही आहे. 

५. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुसज्ज असे स्वच्छतागृह आहे. 

६. अनेक वनस्पतींचे आश्रयस्थान म्हणजे प्रशालेचे वृक्ष मंदिर. 

७. गणित प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इंग्रजी प्रयोगशाळा, रोबोटिक्स वर्ग, ग्रंथालय, एनसीसी कक्ष अशी सुसज्ज दालने प्रशालेस लाभली आहेत. 

८. प्रशालेची इमारत इंग्रजी ओ आकाराची असून मध्यभागी फरसबंद चौक आहे. या फरसंबंध चौकाच्या समोर व्यासपीठ आहे. 

९. विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी पाण्याची टाकी, तसेच नळ आहेत. 

१0. प्रशालेच्या इमारतीच्या गच्चीवर सोलर प्रोजेक्ट उभा करण्यात आला आहे. 

११. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये ई लर्निंग ची सुविधा उपलब्ध आहे. 

१२. शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहनतळ व्यवस्था आहे. 

१३. व्यायाम करण्यासाठी सुसज्ज व्यायाम शाळा आहे. 

१४. दिव्यांग विद्यार्थ्यांची सोय म्हणून रॅम्पआहे. 


मैदान

शाळेची इमारत

वर्ग खोल्या

संगणक कक्ष

विज्ञान प्रयोगशाळा

ग्रंथालय

इंग्रजी प्रयोगशाळा

चित्रकला वर्ग

रोबोटिक्स वर्ग

कलादालन

सोलर प्रोजेक्ट

प्रशालेचे वृक्ष मंदिर