पालक शिक्षक संघ
रमणबाग पालक शिक्षक संघ
कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या अध्यय अध्ययन प्रक्रियेमध्ये तीन घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतात हे तीन घटक म्हणजे शिक्षक विद्यार्थी व पालक.
शालेय शिक्षण व कामकाज सुरळीत रित्या पार पडण्यासाठी या तिन्ही घटकांनी एकत्रित येऊन काम करणे अत्यंत गरजेचे असते. या तीनही घटकांच्या सहयोगातूनच शालेय कामकाज सुरळीत रित्या पार पडते.
प्रशालेमध्ये एकूण सहा इयत्ता आहेत व प्रत्येक एका इयत्तेच्या सहा तुकड्या आहेत. एका सत्रामध्ये साधारण तीन ते चार पालक सभा घेतल्या जातात. वर्षभरामध्ये सहा ते सात पालक सभा घेतल्या जातात.
पहिल्या पालक सभेमध्ये प्रत्येक वर्गाचा एक पालक प्रतिनिधी निवडण्यात येतो. अशा 36 वर्गांचे 36 पालक प्रतिनिधी मिळून पालक प्रतिनिधी मंडळ स्थापन करण्यात येते. या पालक प्रतिनिधी मंडळातून शासकीय नियमानुसार पालक कार्यकारणी सदस्य यांची निवड केली जाते.
पालक कार्यकारिणीमध्ये 11 सदस्य असतात. प्रशालेचे मुख्याध्यापक हे कार्यकारिणीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपकार्याध्यक्ष पालकांमधून निवडले जातात. पालक कार्यकारणीचे सचिव शिक्षकांमधून असतात. पालक कार्यकारणीचे सहसचिव एक शिक्षकांमधून व एक पालकांमधून असतात. व इतर सदस्य पालकांमधून असतात यामध्ये मागासवर्गीय पालकांचा देखील समावेश असतो.
पालक सभांमध्ये शाळेतील उद्दिष्टे, धोरणे,शिस्त,परीक्षा,अभ्यासक्रम, निकाल, शाळेतील विविध उपक्रम शैक्षणिक क्षेत्र भेटी, स्नेहसंमेलन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येते.
वर्षभरामध्ये पालक व शिक्षक एकत्र येऊन अनेक विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवित असतात.
पालकांची शाळेचे नाते दृढ व्हावे यासाठी पालकांसाठी दिवाळी पहाट,स्नेहसंमेलन, मातृशक्ती गौरव सोहळा, तिळगुळ समारंभ यासारख्या कार्यक्रम घेतले जातात.
| पद | नाव |
|---|---|
| मुख्याध्यापिका (अध्यक्ष) | श्रीमती आशा माने |
| पालक - उपाध्यक्ष | श्रीमती श्रावणी सोवनी |
| शिक्षिका- सचिव | श्रीमती सीमा ढोण |
| शिक्षिका- सहसचिव | श्रीमती सुवर्णा केदारी |
| पालक- सहसचिव | श्री विजय लाड |
| पालक -सदस्य | श्रीमती मानसी पवार |
| पालक- सदस्य | श्री योगेश केळापुरे |
| पालक- सदस्य | श्री प्रशांत चांदककर |
| पालक- सदस्य | श्री विनायक महिंद्रे |
| पालक- सदस्य | श्री तुकाराम चव्हाण |
| पालक- सदस्य | श्री शशांक दत्तवाडकर |
| शिक्षक- सदस्य | श्रीमती वैशाली कवडे |
| शिक्षक- सदस्य | श्रीमती सिद्धी देशपांडे |
| शिक्षक- सदस्य | श्री गणेश देशमुख |
| शिक्षक- सदस्य | श्रीमती रंजना साबळे |
| शिक्षक- सदस्य | श्रीमती दीप्ती डोळे |
| शिक्षक- सदस्य | श्रीमती प्रतिभा वडनेरकर |