प्रवेश सुरु

आमच्याबद्दल

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मध्ये आपले सहर्ष स्वागत

school

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळांच्या श्रुंखलेत 14 जून 1946 पासून रमणबाग ही स्वतंत्र शाळा सुरू झाली. त्याआधी नाना वाड्यात भरणाऱ्या मूळ न्यू इंग्लिश स्कूलची एक शाखा रमणबागेच्या आवारात 1914 पासूनच भरत होती. सन 1913 मध्येच कबूतरखान्या लगतची ही रमणबागेची जागा डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यासाठी खरेदी केली होती. रमणबागेच्या आवारात 1936 मध्ये माध्यमिक शाळेचे वर्ग भरण्याला सुरुवात झाली. या माध्यमिक शाळेच्या वर्गांसाठी 1940 मध्ये पश्चिमेच्या बाजूला म्हणजे आजच्या मैदानाच्या बाजूला उभी असणारी 16 वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. शिक्षण खात्याच्या आदेशानुसार 11 मे 1946 रोजी रमणबागेस स्वतंत्र शाळा म्हणून मान्यता मिळाली. या शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून प्राध्यापक केशव गोपाळ नित्सुरे यांची नेमणूक 3 जून 1946 रोजी झाली.

प्रत्यक्षात 14 जून 1946 रोजी रमणबाग स्वतंत्र शाळा म्हणून सुरुवात झाली. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 1947 रोजी शाळेची विद्यार्थी संख्या एक हजार 30 इतकी होती.सन 1952 मध्ये दक्षिण दिशेच्या प्रयोगशाळेच्या इमारतीची बाजू उभारण्यात आली. या इमारतीतच चित्रकलेसाठी स्वतंत्र वर्गाची रचना करण्यात आली होती, प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षात 1971 मध्ये पूर्व दिशेची म्हणजे मुख्याध्यापक कार्यालयाची इमारत, दोन टप्प्यात बांधण्यात आली.

तर 1979 च्या सुमारास विवेकानंद सभागृह आणि व्यासपीठाची इमारत उभारली गेली. पुढे 2010 मध्ये आजच्या संपूर्ण इमारतीच्या उत्तर दिशेला असणारी इमारतीत, ज्या इमारतीत रमणबागेतील पहिले वर्ग सुरू झाले होते, त्या नवीन मराठी शाळेच्या बाजूची सर्वात जुनी बैठी इमारत, पाडून त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयासाठी नवीन इमारतीची उभारणी झाली. आज मितीला प्रशालेत सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असून इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येकी सहा सहा तुकड्या आहेत. संपूर्ण शाळा एकाच वेळी भरते आणि एकाच वेळी सुटते.पुण्यातल्या मराठी माध्यमाच्या आग्रगंण्य शाळांमध्ये रमणबागेचे नाव प्राधान्याने घेतले जाते.

शाळेला भव्य मैदान आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात एवढे मोठे मैदान असणे ही आमची मोठी जमेची बाजू आहे.या मैदानावर माजी विद्यार्थ्यांकडून खो खो व फुटबॉल क्लब विना मोबदला घेतले जातात.शिवाय विविध खेळांचा सराव सुद्धा रोज क्रीडा शिक्षक करून घेतात.शाळेत इंग्लिश भाषा, गणित भूगोल, सायन्स या विषयांच्या प्रयोगशाळा तसेच सुसज्ज ग्रंथालय, रोबोटिक्स लॅब जर्मन व जापनीज भाषा वर्ग संगणक प्रयोगशाळा भव्य चित्रकला वर्ग नाट्यछंद वर्ग असे विविध विभाग कार्यरत आहेत.शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणासह कला क्रीडा या सर्वच विषयांसाठी रमणबागेचा अमिट ठसा जाणवतो.

उद्दिष्ट

शाळा हे आपले दुसरे घर आहे. प्रत्येक मुलाच्या प्रगतीत शाळा महत्त्वाची भूमिका बजावते.  

हेतू:  Growing together, learning together for building nation -  राष्ट्र उभारणीसाठी एकत्र शिकणे 

दृष्टीकोन: The Place to Smile - हसण्यासाठी एक जागा 

शाळा प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी निरोगी आणि आनंदी वातावरण प्रदान करते. 

S-  Success   

M-  Mutual Respect 

I –  Involvement In Studies  

L-  Learning Leadership Qualities 

E-  Enrichment Of Thoughts 

"पुस्तक जिथे संपते तिथे शाळा सुरू होते" असे म्हटले जाते.  या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो. आजचे विद्यार्थी उद्याचे तरुण आहेत. तरुणाई ही प्रत्येक देशाचे भविष्य आणि ताकद आहे.  आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना उद्याचे सर्जनशील, नाविन्यपूर्ण, समजूतदार मानव, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. 

 

 

ध्येय

  • विद्यार्थ्यांना सुसंस्कृत, सर्जनशील आणि संवेदनशील नागरिक बनण्यास सक्षम बनवणे.


  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीन विकास करणे. 


  • विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. 


  • विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे. 


  • विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करणे .

आम्ही सर्वोत्तम का आहोत?

उत्कृष्ट शैक्षणिक घटक

शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.

अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.

अत्याधुनिक सुविधा

शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.

पालकांच्या शाळेबद्दलच्या प्रतिक्रिया