- Events /
- आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला. योग दिनाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ आशा माने.,मा. उपमुख्याध्यापक श्री. जोशी सर, पर्यवेक्षिका सौ. गोरे, पर्यवेक्षिका सौ. शेलूकर आणि क्रीडा विभाग यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. गणपत मोरे, शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. मिलिंद कांबळे, अध्यक्ष शाला समिती, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे या मान्यवरांच्या उपस्थितीत योगदिन साजरा केला गेला.
प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.आशा माने यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना योगाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. श्री. सचिद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना योगामुळे आपले जीवन अधिक सुखद कशा पद्धतीने होऊ शकते आणि योगाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ. सुनिता खरात यांनी केले.
सर्वप्रथम विद्यार्थी बसल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय. श्री नरेंद्रजी मोदी यांचा लाईव्ह संदेश विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सिद्धार्थ बाबर यांनी योगासनाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे घेतली. विद्यार्थ्यांनी देखील ती उत्तम प्रकारे केली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य ,माननीय श्री गणपत मोरे शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य,श्री मिलिंदजी कांबळे अध्यक्ष शाला समिती, श्री. रमेश शेलार क्रीडा विभाग प्रमुख, श्री. सातपुते सर यांनी देखील विद्यार्थ्यांसमवेत योगासने केली.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या योगासनासाठी बैठक व्यवस्था, शिस्त याकडे लक्ष दिले. कार्यक्रमाचे आभार शाळेच्या पर्यवेक्षिका मा. सौ शेलुकर मॅडम यांनी केले.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More