प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • प्रशालेत बहुआयामी तासिकेचे उद्घाटन

प्रशालेत बहुआयामी तासिकेचे उद्घाटन

प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगाने बहरुन येण्यासाठी रमणबाग शाळेत दर शनिवारी बहुआयामी ही आनंददायी तासिका अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाच्या 'आनंददायीशनिवार' या उपक्रमासही तासिकापूरक आहे. शनिवार दि. 27 जून रोजी प्रशालेत यातासिकेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते विराजस कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले , " विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी  तुमच्या शाळेने बहुआयामी तासिकेची योजना केली आहे. शालेय वय खूप महत्वाचं असतं, शाळेत आपण जे विषय शिकतो ते पुढील जीवनात आपल्याला निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहेत.
"आपल्या प्रस्ताविकातून मुख्याध्यापिका श्रीमतीआशा माने यांनी  अभ्यासाबरोबरच बहुआयामी तासिकेचे महत्त्व सांगितले. शिवराज्याभिषेकोत्सवदिन महती, राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य हेमंत पाठक यांनी चिंतनातून उलगडले.   बहूआयामी तासिकाउद्घाटनासाठी नाट्यछंद विभाग प्रमुख  रवींद्र सातपुते यांनी  पाणी बचतीचे महत्त्व आपल्या मूकनाट्याद्वारे अतिशय प्रभावीपणे साद रकेले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भोकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ऋचा कुलकर्णी यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक  महेश जोशी यांनी केले. व्यासपीठावर यावेळी पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर आणि शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे उपस्थित होत्या. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स