प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • जागतिक रंगभूमी दिन

जागतिक रंगभूमी दिन

जागतिक रंगभूमी दिन

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत गुरुवार दिनांक २७ मार्च २०२५ रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा झाला.प्रशालेचे माजी विद्यार्थी;ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री सतीश आळेकर यांना नुकताच जनस्थान पुरस्कार प्राप्त झाला;त्या प्रीत्यर्थ प्रशालेच्या वतीने त्यांचा  मानपत्र,शाल श्रीफळ देऊन हृद्य सत्कार शाळा समितीचे वित्त नियंत्रक डॉ. विनयकुमार आचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. पुण्यात १९६१ मध्ये  पूरग्रस्तांच्या मदत निधीसाठी प्रशालेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी केलेल्या नाट्य महोत्सवाच्या आठवणी आळेकर सरांनी आपल्या मनोगतातून जागवल्या.   

 या दिनाचे औचित्य साधून श्री.अनिल प्रयाग पुरस्कृत नाट्यप्रेमी आणि शाळेचे माजी विद्यार्थी सदानंद आचवल यांच्या स्मृत्यर्थ  शालेय रंगभूमीवर नाटकात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना  देण्यात आले. सदानंद आचवल नाट्य आराधना पुरस्कार प्रत्युष महामुनी ९ वी व नाट्यप्रेमी सदानंद आचवल नाट्य प्रेरणा पुरस्कार आयुष दुसाने ,१० वी या विद्यार्थ्यांना ‘रमणबागीय आजी-माजी विद्यार्थी कलाकार मेळाव्यात’ प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक    पं.अतुलकुमार उपाध्ये,  

रोटरी क्लबचे डॉ. दिलीप देशपांडे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ नटराज पूजनाने झाला.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या व संगीतकार अजय पराड यांनी संगीत दिलेल्या नांदीचे  शालार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इथून पुढे रमणबागेच्या प्रत्येक नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ही नांदी म्हटली किंवा वाजवली जावी यासाठी हे शालार्पण मुख्याध्यापकांनी केले .नाट्य,सिनेमा,मालिका, तंत्रज्ञ,व्हिडिओ एडिटिंग,लेखन,दिग्दर्शन, 

अभिनय ,प्रकाशयोजना अशा सिने नाट्यक्षेत्रातील विविध बाजू सांभाळणारे शाळेचे नामवंत माजी  विद्यार्थी कलाकार  या मेळाव्यास आवर्जून उपस्थित होते. प्रत्येकाने आपली कलाकार म्हणून जडणघडण शाळेतच झाल्याचे आवर्जून सांगितले. 

प्रशालेच्या मुख्याध्यापक सौ.चारुता प्रभुदेसाई यांची ही संकल्पना होती. नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. रवींद्र सातपुते  आणि नाट्य छंद विभागातील त्यांचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. 

श्री.सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

उपप्रमुख ज्येष्ठ नेपथ्यकार जयंत टोले,पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे  तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतरांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स