प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • महिला दिन

महिला दिन

महिला दिन

उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत येताना जसं कौतुक झालं होतं तसंच आज शाळेत कौतुक झालं....परंतु आजचं कौतुक शेकडो मुलांच्या साक्षीनं होतं.. आम्हा शिक्षिकांच! 

महिला दिनाच्या औचित्याने रमणबागेच्या फरसबंद चौकात फुलांच्या पायघड्यांवरून शाला प्रमुख चारुता प्रभुदेसाई,पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे, प्रमुख अतिथी मेघा नगरे,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिलांना व्यासपीठावर आणण्यात आले.  

प्रत्येक महिलेचा पुरुष सहकारी शिक्षकाने आपुलकीने भेटवस्तू देऊन सत्कार  केला.... 

प्रत्येकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटून आले होते...  

 प्रशालेचे माजी विद्यार्थी निलेश गिरमे यांनी महिला शिक्षिकांसाठी भेटवस्तू दिल्या. 

उपशालाप्रमुख जयंत टोले यांनी विद्यार्थ्यांना आई, आजी, बहिण यांचा सन्मान करण्याचे,त्यांच्या प्रति आपले प्रेम व भावना व्यक्त करायला सांगितले. प्रमुख अतिथी मेघा नगरे शालेय जीवनात शिक्षण संस्कार व जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन केले.रवींद्र सातपुते यांनी अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले तर देवेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स