- Events /
- रमणबाग प्रशालेत ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा
रमणबाग प्रशालेत ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या शालाप्रमुख मा.सौ.चारुता प्रभुदेसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्त, समता, बंधुता व राष्ट्रप्रेम या मूल्यांची शिकवण घेऊन एक उत्तम नागरिक व्हावे व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करावे असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील निवडक क्षणचित्रांच्या भित्तिपत्रकांचे प्रकाशन प्रशालेच्या शाळा समितीचे अध्यक्ष मा.डॉ.शरद अगरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही भित्तीपत्रके कलाशिक्षक सौ. अंजिली मालुसरे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार केली. सर्व पदाधिकारी शिक्षक,शिक्षकेतर विद्यार्थी व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम
-
प्रशालेत बहुआयामी त ...
२७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More
-
रमणबाग प्रशालेत गुणग ...
4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More
-
आंतरराष्ट्रीय योग दि ...
२१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More
-
प्रशालेत व्हायोलिन क ...
१९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More
-
रमणबाग शाळेतील विद्य ...
६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More