प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय उपशिक्षणाधिकारी प्रणिता कुमावत उपस्थित होत्या. विज्ञान उपकरण निर्मिती,बॅजेस स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, विज्ञान प्रश्न कोडे,रांगोळी स्पर्धा, स्केलेटन प्रतिकृती स्पर्धा,आयसर, तारांगण येथे क्षेत्रभेटी, विद्यार्थ्यांसाठी फिरती विज्ञान प्रयोगशाळा इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.विज्ञान दिनानिमित्त मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीची भव्य रांगोळी फरस बंद चौकात साकारण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यासाठी उपक्रमशील रमणबाग शाळेने घेतलेल्या उपक्रमांचे माननीय कुमावत मॅडम यांनी कौतुक केले. प्रशालेच्या शालाप्रमुख माननीय चारुता प्रभूदेसाई यांनी विद्यार्थ्यांना नवनिर्मिती करून देशाची प्रगती करण्यात योगदान करावे असे आवाहन केले.विज्ञान विभाग प्रमुख प्रतिभा जक्का व सिद्धी देशपांडे  यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले त्यांना सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले.विज्ञान विषयक विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले त्यांना विज्ञान मंडळ प्रमुख राधिका देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.हेमंत पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रतिभा वडनेरकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला तर दीप्ती डोळे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अर्चना गोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. 

कार्यक्रम

  • प्रशालेत बहुआयामी  तासिकेचे उद्घाटन

    प्रशालेत बहुआयामी त ...

    २७ जून २०२६: विद्यार्थ्यांचे व ... Read More

  • रमणबाग प्रशालेत गुणगौरव समारंभ

    रमणबाग प्रशालेत गुणग ...

    4 जुलै 2026: रोजी माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ... Read More

  • आंतरराष्ट्रीय योग दिन

    आंतरराष्ट्रीय योग दि ...

    २१ जून २०२६ : १२ वा आंतरराष्ट् ... Read More

  • प्रशालेत व्हायोलिन कार्यक्रमाचे सादरीकरण

    प्रशालेत व्हायोलिन क ...

     १९ जुलै २०२५ : डेक्कन एज ... Read More

  • रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आषाढी वारीचा अनुभव

    रमणबाग शाळेतील विद्य ...

    ६ जुलै २०२५ : रोजी न्यू इंग्लि ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स