Achievement Spotlight
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये अभिमानास्पद नोंद!
ऐतिहासिक क्षण – 'जाणता राजा' महानाट्याचे भव्य सादरीकरण
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे-30 च्या 2550 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी 17 डिसेंबर 2013 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे भव्य व ऐतिहासिक सादरीकरण केले. या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ (Limca Book of Records - National Record) मध्ये झाली आहे.
ही केवळ एक नाट्यप्रवेश सादरीकरण नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेचे भव्य दर्शन घडवणारा एक ऐतिहासिक सोहळा ठरला. विद्यार्थ्यांची एकजूट, समर्पण आणि शिवचरित्राच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या अनोख्या प्रयत्नाचे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा ऐतिहासिक विक्रम!
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग परिवारास हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छा!
More Achievements
'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा 2024' मध्ये रा ...
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणेची राज्यस्तरीय गौरवशाली कामगिरी ...
Read More →
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये अभिमानास्पद नोंद!
ऐतिहासिक क्षण – 'जाणता राजा' महानाट्याचे भव्य सादरीकरण Read More →