प्रवेश सुरु

लोकशाहीच्या उत्सवासाठी

लोकशाहीच्या  उत्सवासाठी Posted on March 24, 2025

सौ दीप्ती डोळे

शिक्षिका

गेले कितीतरी दिवस एकही सुट्टी न घेता काम सुरू आहेच....

रणरणत्या उन्हात सुद्धा ड्युटी फर्स्ट....

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

चार-पाच मजले चढून, अंधारे जिने चढत, अवघड वाटा तुडवत, लोकांकडून बरे-वाईट ऐकून घेत एकेका मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू आहेच...

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

बीपी/ डायबेटीसच्या गोळ्या खात, सकाळचे जेवण संध्याकाळी करत मतदान संबंधी कार्याचे कर्तव्य पार पाडत आहेतच....

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

 

वृद्धाश्रमापासून ते वाड्या वस्त्यांपर्यंत, अंध, दिव्यांगांपासून अंथरुणावर असणाऱ्यांनाही मतदानाचा हक्क मिळावा यासाठी फिरस्ती सुरू आहेच....

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

 

कार्यालयीन काम,घरातील अडचणी असंख्य प्रश्न सोडवत  तारेवरची कसरत सुरू आहेच.....

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

 

 निवडणुकी दिवशी सर्वकाही सुरळीत पार पाडावे म्हणून अखंड लगबग सुरू आहेच....

#लोकशाहीच्या  उत्सवासाठी#

 

उत्सव लोकशाहीचा

प्रत्येक भारतीयाचा....

उत्सव कर्तव्याचा

उद्याच्या स्वप्नाचा.... BLO म्हणून काम करताना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करताना कधी चार-पाच जिने चढून वर जावे लागले, तर कधी बरे वाईट ऐकून घ्यावे लागले, कधी माणूसकी दिसली तर कधी नात्यांमधली तेढ, कधी चहा पाणी विचारले गेले तर कधी स्वामींचे दर्शन, कधी एकट्याच वयोवृद्ध घरात आपुलकी दिसली तर कधी सेलिब्रिटी भेटले....

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित....