प्रवेश सुरु

सहकार्यम यशोधनम्

सहकार्यम यशोधनम् Posted on April 4, 2025

राधिका राजेश देशपांडे

सहाय्यक शिक्षक

"साथी हात बढाना एक एक अकेला थक जायेगा मिलकर साथ बढाना"
या उक्तीप्रमाणे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करायला हवा. एकमेकांना सहकार्य करून टीम वर्क केल्यास मोठी अशक्यप्राय कामेही सहजसाध्य व वेळेपूर्वी होतात. परस्परांच्या नवनवीन कल्पना, बहुआयामी विचार,परस्परांचा मतांचा सन्मान,अनेक मार्गातून योग्य मार्गाची निवड व एकवाक्यता अशा मंथनाचा परिपाक गटकार्यातील सहकार्यातून होतो.शांत समंजसपणे आपले मत मांडणे;त्याचे महत्त्व पटवून देणे,इतरांच्या योग्य मतांचा व स्वीकार करणे,गटातील सर्व सहकाऱ्यांची मोट बांधून कार्य सिद्धीस नेणे यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व गुण गटकार्यातून विकसित होतात. शिस्तबद्ध गटकार्याचे उदाहरण मधमाशांचे होय! विविध फुलांमधील मकरंद गोळा करून प्रत्येक 
कामकरी मधमाशी पोळ्यामध्ये 
बिनबोभाट जमा करते.एका मधाच्या  पोळ्यात हजारो मधमाश्या कशा गुण्यागोविंदाने राहतात?संकट आल्यावर एकजुटीने घोंगावत हल्ला करतात.सहकार्याचा आदर्श 
वस्तू पाठच! सहकार्य करताना त्यातून' एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणेच चांगल्या गोष्टींसाठीच सहकार्य करणे गरजेचे असते.परीक्षेत पास होण्यासाठी कॉपी करून एकमेकांना सहकार्य करणे किंवा लोकांना दहशत बसवण्यासाठी गुंडगिरी करणे असे सहकार्य समाजाच्या दृष्टीने घातकच असते याचे भान आपण राखले पाहिजे.