स्वातंत्र्य म्हणजे काय?
Posted on April 4, 2025
सौ.चारुता शरद प्रभुदेसाई
मुख्याध्यापकस्वातंत्र्य म्हणजे काय?
अन्न,वस्त्र,निवारा,यांच्याइतकीचअत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे स्वातंत्र्य.
बांधलेलं,जखडलेल्या अवस्थेत ,दुसऱ्याच्या नजरेखाली असलेलं कुणाला आवडेल???
पिंजऱ्यात असलेल्या पोपटाचे कुणी कितीही
लाड केले तरी त्याला आनंदी वाटत नाही.
तो दुःखी च राहतो.
इथे मी तुम्हाला मी वाचलेली एक गोष्ट सांगते बरं का!.दोन छोटी बहीण भावंडे खूप गरीब असतात.आपल्या आईबरोबर मोलमजुरी करत असतात.रोज कामाला जाताना येताना बाजारातून जात असताना त्यांना एका पक्ष्यांच्या दुकानात वेगवेगळे पक्षी दिसत असतात.मुले रोज ते पक्षी न्याहाळत,त्यांच्याशी बोलत,आणि दुकानदाराला किमती विचारात.
एके दिवशी दुकानात एक छान इटुकला पक्षी त्यांना पिंजऱ्यात दिसतो.तो खूप छान गात असतो.मुलांना तो बघून खूप मजा वाटते.त्याची किंमत थोडी महाग असते.मुलांना तो विकत घ्यायचा तर खूप कष्ट करावे लागणार होते.मुले खूप कष्ट करून पैसे मिळवतात.आणि दुकानात येतात.तो पक्षी खरेदी करतात आणि पिंजरा घेऊन नदीकाठी येतात.तिथे आल्यावर हळूच पिंजर्याचे दार उघडतात आणि पक्ष्याला सोडून देतात.आनंदाने लकेर घेत पक्षी भरकन आकाशात उडू जातो,आणि मुलेही आनंदात घरी येतात.
पक्षी विकत घेऊन तो असाच सोडून देणारी ती लहान मुले मला किती महान वाटतात!!
प्रत्येकाला आपण स्वतंत्र असावं असं वाटतं.
इंग्रजांनी अनेक वर्षे आपल्याला त्रास दिला. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे काय हेच आपण विसरून गेलो होतो.पण स्वातंत्र्य सैनिकांच्या
कष्टांमुळे आपण पुन्हा स्वतंत्र झालो.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे पण लक्षात ठेवले पाहिजे.आज आपण स्वतंत्र देशात वावरतो आहोत,आपल्याला विचार,आचार,उच्चार स्वातंत्र्य आहे.